अल्पसंख्यांक समाजावर होणारे हल्ले बंद करा, भाकपाची निदर्शने

 0
अल्पसंख्यांक समाजावर होणारे हल्ले बंद करा, भाकपाची निदर्शने

अल्पसंख्यांकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ 

भा. क.प. ची तीव्र निदर्शने... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - 

गेल्या काही वर्षांपासून दलित, मुस्लिम, ख्रिश्चन , आदिवासी इत्यादी अल्पसंख्याकांवर हल्ले वाढत चाललेले आहेत. महागाई बेरोजगारी, भ्रष्टाचार, इत्यादी समस्यांवरून बहुसंख्यांक हिंदूंचे लक्ष विचलित करण्यासाठी अल्पसंख्यांकांबद्दल द्वेष निर्माण करून मशिदी, चर्च, विहार इत्यादींवर हल्ले करण्यासाठी बहुजन तरुणांचा वापर केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी मदर टेरेसा चौक ईदगाहजवळ भाकपतर्फे निदर्शने करण्यात आली. 

याबाबत असे की, अल्पसंख्याकांवर

हल्ला करायला लावणाऱ्या पुढार्‍यांची मुले परदेशात शिकायला आणि बहुजनांची मुले लाठ्या काठ्या घेऊन अल्पसंख्यांकांवर हल्ले करायला, गुन्हे अंगावर घेऊन करिअर बरबाद करून घ्यायला असा प्रकार सुरू आहे. त्याचबरोबर आदिवासी आणि दलितांवर हल्ले करून ॲट्रॉसिटी वाढलेल्या आहेत. त्याच्या तक्रारी देखील घेतल्या जात नाहीत. संविधानाने दिलेले संरक्षण नाकारले जात आहे. छत्तीसगड मधील नन्सवर झालेला हल्ला व त्यांना झालेली अटक, विशालगड मधील मशिदींवरील झालेल्या हल्ला असेल किंवा त्यानंतर अनेक मशीदिवर झालेले हल्ले असतील , चर्च वरील हल्ले असतील, बौद्धगये मधील प्राचीन बौद्ध विहारावर झालेला हल्ला असेल हे सर्व निषेधार्य आहेत. या विरोधात नाराजी आणि निषेध व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेने लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने व्यक्त होण्यासाठी निदर्शने आयोजित केली होती . सर्वांनी घरात बसून न राहता एक तास संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी देऊयात अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सहभागी व्हा असे आवाहनही करण्यात आले होते. प्रमाणे अनेक सजग महिला पुरुष नागरिक या निदर्शनासाठी मदर टेरेसा चौक ईदगाजवळ छावणी येथे जमा झाले. त्यावेळी हिंदू मुस्लिम बौद्ध जयंती पारशी लिंगायत शिवधर्मी ख्रिश्चन हम सब भाई भाई, अल्पसंख्याकांवर हल्ले करणाऱ्यांवर एफ आय आर झालाच पाहिजे, मशिदी विहार चर्चवर हल्ले करणे बंद करा, शांतता प्रस्थापित केलीच पाहिजे, बहुजनांच्या मुलांना मुस्लिमांविरोधात ख्रिश्चन आणि विरोधातील हल्ल्यात वापरणे बंद करा, भाजपच्या नेत्यांची मुलं परदेशात शिकायला आणि बहुजन हिंदूंची पोर मारामाऱ्या करायला , हे असं का जवाब दो, भाकड जनावरांचा प्रश्न सोडवलाच पाहिजे, गोवंश हत्या बंदीच्या नावाने कुरेशी समाजावर हल्ले करणे बंद करा, बुद्धगया विहार पूर्णपणे बौद्धांच्या स्वाधीन केलंच पाहिजे इत्यादी घोषणांनी मदर टेरेसा चौक दणाणला. यावेळी 

ॲड. कॉ. अभय टाकसाळ, जॅक्सन फर्नांडिस, विकास गायकवाड, फेरोज खान, अजहर इनामदार, इब्राहिम पटेल, अशोक दामले,ॲड. आनंद कांबळे, ॲड. शेख अय्याज, ॲड. उमेश इंगळे,प्रकाश बनसोडे, सुरेश बनसोडे, किरणराज पंडित, अनंता कराळे, योगेश साळवे, मधुकर गायकवाड, शेख हमीद, करण घुमारे, स्मिता श्रीसुंदर, समाधान पारधी, नोबद जोसेफ, सुनील त्रिभुवन, रियाज मुल्ला, प्रदीप राठोड, शेख मेहबूब, लोकेश कांबळे, मनीषा बल्लाळ, अशोक शेरकर, प्रतीक शिंदे, ग्रेग्री मरियन, सनी पाटोदे, शेख एजाज, शेख वसीम, जफर खान, अमजद भाई, सतीश साळवे, चेरी पारखे, तौसीफ खान यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. या निदर्शनात यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow