शहरात 3 दिवस मटन शाॅप बंद राहणार, कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश...

 0
शहरात 3 दिवस मटन शाॅप बंद राहणार, कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश...

3 दिवस मटण शॉप, कत्तलखाने बंद राहणार

महापालिकेचे आदेश...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - सणासुदीच्या काळात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले जात आहे. शहरातील सर्व खासगी कत्तलखाने, म्हैस मांस विक्रेते, बकरा मटन व कोंबडी मटन विक्रेते यांनी आपली दुकाने 15, 20 आणि 27 ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्येही 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत. 

महानगरपालिकेच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती 20 ऑगस्ट आणि जैन पर्युषण पर्व व 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी असल्याने या तिन्ही दिवशी सर्व मांस दुकाने, कत्तलखाने आणि संबंधित व्यवसाय पूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावे. धार्मिक सौहार्द, सार्वजनिक शांतता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध परवाना रद्द, दंड किंवा गुन्हा दाखल अशाप्रकारे कठोर कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन या आदेशानंतर संतप्त झाले आहे. त्यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा आनंदाचा दिवस आहे. या दिवशी मांसाहार खायचा का नाही हे पण सरकारने ठरवायचे का हे कोणते स्वातंत्र्य आहे अशी टिका त्यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow