खासदार पदासाठी संजय सिरसाट इच्छुक... भाजपा - शिंदे गटात वाढले इच्छुक

 0
खासदार पदासाठी संजय सिरसाट इच्छुक... भाजपा - शिंदे गटात वाढले इच्छुक

खासदार पदासाठी संजय सिरसाट इच्छुक... भाजपा - शिंदे गटात वाढले इच्छुक

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केल्याने भाजपा-शिंदे गटात इच्छूकांची संख्या वाढली आहे. भाजपाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे तर निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विद्यमान खासदार इम्तियाज जलिल यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास इच्छूकांची संख्या वाढतच चालली आहे. भाजपा -शिंदे गटात इच्छूकांची संख्या वाढत असताना आमदार संजय सिरसाट म्हणाले हि जागा शिवसेनेची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील कोणाला उमेदवारी द्यायची आहे. 

शिंदे गटाकडून पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय सिरसाट तर भाजपाकडून डॉ.भागवत कराड, मंत्री अतुल सावे, भाजपाचे राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर इच्छुक आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेस कडून माजी आमदार सुभाष झांबड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे हे लोकसभा निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत आपला उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow