खासदार भुमरेच्या ड्रायव्हरकडे 150 कोटींची जमीन...? आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरु...

अबब...खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरकडे 150 कोटींची जमिन...?, गुन्हे शाखेची चौकशी सुरु
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद) चे खासदार संदीपान भुमारेंच्या ड्रायव्हरकडे 150 जवळपास किंमत असलेली जमिन असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संदीपान भुमारे हे शिंदे गटाचे खासदार आहे तर त्यांचे सुपुत्र विलास भुमारे हे पैठणचे आमदार आहेत. जावेद रसुल हे मागिल अनेक वर्षापासून त्यांचे ड्रायव्हर आहेत. हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबाच्या वंशजाने जावेद रसुलला हि जमीन गिफ्टमध्ये हि मालमत्ता हिबानामा करुन दिल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार समोर आले आहे. हि मालमत्ता भेट म्हणून जावेद रसुलला मिळाली त्याची अंदाजे किंमत 150 कोटी आहे. या प्रकरणी परभणी येथील एका वकीलाने तक्रार केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या जमिनीची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात संदीपान भुमरे व विलास भुमरे पिता पुत्र अडचणित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबातील वंशजाने जालना रोड येथील उच्चभ्रु वस्तीतील दाऊदपुरा येथील तीन एकर जमीन भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसुल यांना भेट म्हणून दिली आहे. या जमीनीची सध्याची किंमत 150 कोटींच्या आसपास आहे. मागिल 13 वर्षांपासून जावेद रसुल भुमरे कुटुंबात ड्रायव्हर आहेत. आमदार विलास भुमरे यांनी या प्रकरणी सांगितले ड्रायव्हरच्या वैयक्तीक आयुष्याशी आपले काही संबंध नाही, हिबानामा ही मालमत्ता भेट देण्याची कायदेशीररित्या वैध प्रक्रीया आहे. या प्रकरणी चौकशीसाठी मला आणि वडीलांना पोलिसांनी माहितीसाठी बोलावले याचा निषेध करत आंग झटकले.
सालारजंग कुटुंबातील वंशजाने हि तीन एकर जमिन हिबानामा(भेट) म्हणून दिली यानंतर या व्यवहारांवर संशय आल्याने परभणीच्या एका वकीलाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. एका ड्रायव्हर कडे 150 कोटी जवळपास किंमतीची जमीन खरेदीसाठी आले कोठून हे चौकशीत समोर येईल.
जावेद रसुलने या प्रकरणी सांगितले मी तपासाला सहकार्य करत आहे. हैदराबाद येथील सालारजंग वंशजांशी माझे जवळचे संबंध आहे.
सालारजंग कुटुंबातील अनेक सदस्यांनी हैदराबादच्या पूर्वीच्या निजामाचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे.
मजहर अली आणि इतर सहा जणांनी केलेल्या भेटवस्तूच्या कागदपत्रात असे म्हटले आहे की त्यांना 30 जानेवारी 2023 पर्यंत चाललेल्या प्रदीर्घ खटल्यानंतर दाऊदपुरा येथील बाग शेरगंज येथील कुळाच्या 12 एकरपैकी तीन एकर जमीनीचा वाटा मिळाला. तीच जमीन भेटवस्तू म्हणून जावेद रसुलला भेटवस्तू म्हणून दिली गेली परंतु परभणी येथील तक्रारदार वकील मुजाहिद खान म्हणाले जावेद हा सालारजंग कुळाशी फारसा संबंधित नव्हता या वस्तू स्थितीमुळे उत्सुकता वाढली. हाबानामा कायदेशिर रित्या फक्त रक्ताच्या नातेवाईकांमध्येच वैध आहे. जावेद आणि सालारजंग वंशजांचा काय संबंध हे चौकशीत समोर येईल. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले करारावर स्वाक्षरी करणारे सालारजंग कुटुंबातील सदस्य मीर मजहर अली खान आणि सहा नातेवाईकांनी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी नोटीशीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. जावेदच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी केली जात आहे. हि माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टवर आधारीत आहे.
What's Your Reaction?






