चढ्या दराने बियाणे व खते विकणा-या व्यापा-यांवर गुन्हे दाखल करा - अंबादास दानवे

चढ्या दाराने बियाणे व खते विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा....
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सूचना
गंगापूर, दि.8(डि-24 न्यूज) शेतकऱ्यांना चढ्या दाराने बियाणे व खते विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, अशी सूचना राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कृषी अधिकाऱ्यांना केली. विविध गावांत दानवे यांच्याकडे गाव भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यापारी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी खते बियाणे आवश्यक असल्याने खते व बी - बियाणे चढ्या दराने आणि लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी केल्या.
आज 8 जून रोजी गंगापूर तालुक्यातील दहेगाव येथील एका कृषी सेवा केंद्र दुकानास अंबादास दानवे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात वस्तुस्थिती तपासली. कृषी सेवा केंद्रांच्या गोदामाची पाहणी करून खते व बी - बियाणे असणाऱ्या पुरवठ्याची माहिती घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना ठरलेल्या दरात बियाणे मिळालेच पाहिजे व कसल्याच प्रकारची लिंकिंग न होऊ देता शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे उपलब्ध करुन द्या, अशा सक्त ताकीदच दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिली.
What's Your Reaction?






