जरांगेंच्या लढ्याला यश... अध्यादेश काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक

ताजी बातमी...
अध्यादेश काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक, जरांगेंची मागणी मान्य...
मुंबई, दि.26(डि-24 न्यूज)
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज नवी मुंबईत दाखल झाला आहे. आज वाशीत सरकारी अधिकारी आणि मराठा समाजेचे नेते यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चे नंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे पत्र देण्याची होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तब्बल 3.30 तास चाललेल्या या बैठकीत याबाबत नवा अध्यादेश काढण्याची तयारी करण्यात आल्याचे समजते. तसेच हा अध्यादेश आजच काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






