जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, गोदाकाठच्या नागरीकांना सतर्कतेचे आवाहन...

जायकवाडी धरणातून विसर्गात वाढ, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पैठण, दि.28(डि-24 न्यूज)-
जायकवाडी तलाव नाथसागर जलाशयातून रविवारी (दि. 28 सप्टेंबर 2025) रात्री विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाच्या दरवाज्यांमधून वाढविण्यात आलेला विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडला जात असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, जायकवाडी प्रकल्प तर्फे करण्यात आले आहे.
विसर्गाचा तपशील
दि. 28 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 ते 10:45 या वेळेत जायकवाडी धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे एकूण 18 नियमित दरवाजे 0.5 फूट उचलण्यात आले. त्यामुळे या दरवाज्यांमधून गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेक इतका अतिरिक्त विसर्ग सोडण्यात आला.
यामुळे सांडव्याद्वारे एकूण 18 नियमित गेट व 9 आपत्कालीन गेटमधून मिळून 2,82,960 क्युसेक इतका विसर्ग सुरू राहणार आहे.
आवक–जावक स्थितीप्रमाणे बदल
धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
सतर्कतेचे आवाहन
गोदावरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे व अनावश्यकपणे नदीकाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






