जालना, कंपनी विस्फोटातील रुग्ण शहरातील रुग्णालयात, मंत्री अतुल सावे यांनी घेतली भेट
पालकमंत्री अतुल सावे यांनी केली जखमी रुग्णांची पाहणी..
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज ):- जालना येथील औद्योगिक वसाहती मधील स्टील कंपनीत विस्फोट झाला. यात अनेक जण गंभीर झालेले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेत त्यांना धीर दिला.
शनिवारी दुपारच्या सुमारास जालना येथील औद्योगिक वसाहती मधील स्टील कंपनीत मोठा स्फोट झाला. या घटनेत जवळ पास 15 जण जखमी झालेले त्यांना जालना येथील ओम रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत तर या घटनेत 7 जण गंभीर जखमी झालेले आहेत. या रुग्णांना पुढील उचारासाठी छत्रपती संभाजीनगर मधील बीड बायपास येथील बेंबडे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अतुल सावे यांनी रुग्णाच्या आरोग्याबाबत संबंधित डॉक्टरांशी चर्चा करत रुग्णांची भेट घेत त्यांना धीर दिला.
What's Your Reaction?