जिल्ह्यात 2993403 मतदार, 1 लाख 20 हजार 660 मतदारांनी केली नोंदणी

 0
जिल्ह्यात 2993403 मतदार, 1 लाख 20 हजार 660 मतदारांनी केली नोंदणी

औरंगाबाद जिल्ह्यात 

1 लाख 20 हजार 660 नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतून 63 हजार 207 मतदारांची नावे वगळली...

नवमतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन...

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी मतदारांची अंतिम यादी 23 जानेवारी रोजी जाहीर झाली असून जिल्ह्यातील मतदारांची संख्या आता 29 लाख 93 हजार 403 झाली आहे. यामध्ये 1 लाख 20 हजार 660 नवीन मतदारांची नोंदणी झाली, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी दिली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते. 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार 15 लाख 34 हजार 700 तर स्त्री मतदार 13 लाख 78 हजार 437, तृतीयपंथी मतदार 91 असे एकूण मतदारसंख्या 29 लाख 13 हजार 228 इतकी होती. तर 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत पुरुष मतदार 15 लाख 49 हजार 335, स्त्री मतदारांची संख्या 13 लाख 95 हजार 775 व तृतीयपंथी मतदार 101 असे एकूण मतदारसंख्या 29 लाख 45 हजार 211 इतकी होती. तर 23 जानेवारी 2024 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार 15 लाख 70 हजार 739, स्त्री मतदार 14 लाख 22 हजार 531 व तृतीयपंथी मतदार 133 असे एकूण मतदारसंख्या 29 लाख 93 हजार 403 इतकी आहे, अशी माहिती देवेंद्र कटके यांनी यावेळी दिली. 

त्यामध्ये 1 लाख 20 हजार 660 इतकी नवीन मतदार नोंदणी झाले तर 63 हजार 207 एवढ्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत. घरोघरी पडताळणी व पीएसई, डीएसईच्या माध्यमातून मतदार यादी शुध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये घरोघरी पडताळणी मध्ये 38 हजार 44 दुबार, स्थलांतरीत व मयत मतदारांचे नांव वगळण्यात आली. तसेच पीएसई मध्ये 6 हजार 702 व डीएसई मध्ये 2 हजार 397 मतदारांचे नाव वगळण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

मतदार यादीत नवमतदार यांची नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात विशेष शिबीर घेण्यात आले. याद्वारे 21 हजार 226 नव मतदारांची नोंदणी करण्यात आली. प्रारुप मतदार यादीत 18-19 या वयोगटाचे मतदारांची संख्या 10 हजार 360 इतकी होती. तर अंतिम मतदार यादीत या वयोगटाची मतदार संख्या 34 हजार 109 इतकी झाली आहे. या मध्ये 23 हजार 749 मतदारांची वाढ झाली. तर प्रारुप मतदार यादीत 20-29 या वयोगटाचे मतदारांची संख्या 5 लाख 65 हजार 937 इतकी होती. 23 जानेवारी रोजीच्या यादीनुसार 20-29 या वयोगटाची मतदार संख्या 6 लाख 4 हजार 858 इतकी आहे. या मध्ये 38 हजार 921 मतदारांची वाढ झाली आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या बघितली तर...

सिल्लोड- 334073          

कन्नड- 321756          

फुलंब्री- 343327         

औरंगाबाद मध्य- 339045                      

औरंगाबाद पश्चिम- 374485                    

औरंगाबाद पूर्व- 326900                      

पैठण- 308698      

गंगापूर- 337959           

वैजापूर- 307160         

एकूण मतदार- 2993403

मराठवाड्यातील मतदार संख्या झाली दीड कोटींच्या वर...

औरंगाबाद- 2993403

नांदेड - 2671537

बीड-2115813

लातूर - 1945771

जालना - 1569644

परभणी- 1482365

उस्मानाबाद - 1366722

हिंगोली - 946167

---------------------------------

एकूण मतदार- 15091422

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow