दिव्यांग अक्रामक, रस्ता केला जाम...!
दिव्यांग अक्रामक, रस्ता केला जाम...!
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) महापालिका प्रशासन दिव्यांगांसाठी राखिव असलेला पाच टक्के निधी मिळत नसल्याने हजारो लाभार्थ्यांना मिळणारा उदरनिर्वाह भत्ता काही महीन्यात पासून रखडल्याने लाभार्थी त्रस्त झाल्याने महापालिकेच्या मुख्यालयासमोर जिल्हा सर्वपक्षिय दिव्यांग एकता मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन करत चक्क रस्ताच जाम केला. जोपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात उदरनिर्वाह भत्ता जमा केला जात नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.
यावेळी काँग्रेस दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष मुदस्सर अन्सारी यांनी सांगितले दिव्यांगांचा अकरा महीन्याचा उदरनिर्वाह भत्ता थकीत आहे. पाच टक्के दिव्यांग निधी राखून दिव्यांगांच्या विविध योजना राबवण्यासाठी आहे. हा निधी अन्य विभागाकडे वळवून आम्हाला वंचित ठेवले जात आहे. तात्काळ दिव्यांगांच्या मागण्या मान्य झाले नाही तर दोन खासदार व तीन आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिव्यांग लाभार्थ्यांनी दिला आहे.
आयुक्तांना औरंगाबाद जिल्हा सर्वपक्षीय दिव्यांग एकता मंचाच्या वतीने दिलेल्या निवेदनात सन 2024-2025 चा पाच टक्के निधी त्वरीत देण्यात यावा. उदरनिर्वाह थकीत भत्ता देण्यात यावा. शिष्यवृत्ती 1 ते 13 व 13 ते 17 वर्षाचे शाळांचे मुला मुलींनी मागिल दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. दिव्यांगांना रोजगारासाठी दोनशे स्क्वेअर फिट जागा देण्याचा जि.आर.असताना आजपर्यंत ती जागा दिली नाही. आंदोलनात दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने कुबड्या घेवून व तीनचाकी गाड्यावर येत सहभागी झाले.
यावेळी औरंगाबाद जिल्हा सर्वपक्षीय दिव्यांग एकता मंचचे जिल्हाध्यक्ष शेख मुनीर शेख गुलाम अहेमद, काँग्रेस दिव्यांग सेलचे शहर जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी, एमआयएम दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष मोहसीन खान, उपाध्यक्ष अब्दुल्ला बाबू शेख, पूर्व मतदार संघ अध्यक्ष सय्यद कलिम, रहिम खान, सईद खान, शेख अलीम आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?