नाशिक धर्मांतरण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची युवा सेनेची मागणी...!
नाशिक धर्मांतर प्रकरणाची सखोल चौकशी करावी...
छत्रपती संभाजीनगर युवासेनेच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)- नाशिक येथे उघडकीस आलेल्या कथित धर्मांतर रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या निदा एजाज खान हिला 7 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली असल्याने छत्रपती संभाजीनगर युवासेनेच्या वतीने पोलीस उपायुक्त पंकज आतुलकर यांची भेट घेऊन सकल चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
सदर प्रकरणाचा तपास केवळ वरवर न करता सर्व बाजूंनी सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. महिलांची सुरक्षितता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका युवासेनेच्या वतीने मांडण्यात आली..
याप्रसंगी युवासेना विभागीय सचिव धर्मराज दानवे, जिल्हाधिकारी हनुमान शिंदे, महाविद्यालय कक्षप्रमुख अभिजीत थोरात, शहराधिकारी रामेश्वर कोरडे, अजय चोपडे, स्वप्नील डीडोरे, शहर समन्वयक मधुर चव्हाण, शहर चिटणीस नागेश थोरात, हरीष पाटील, साहिल लहाने, साईनाथ थोरवे, अमित लहाने, चरण शिंदे व धनपाल राजपूत आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?