पालकमंत्र्यांना राखी बांधून ब्राह्मण समाजाच्या वतीने दिले निवेदन
पालकमंत्र्यांना राखी बांधून ब्राह्मण समाजाच्या वतीने दिले निवेदन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ब्राह्मण समाजाच्या विविध मागणीसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने निवेदन देण्यात आले. सरकारने 10 ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य केली नाही तर राज्यात 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना यावेळी भगिनींनी राखी बांधून वचन घेतले की समाजाच्या वतीने पोटतिडकीने या मागण्या करत आहेत आतापर्यंत अनेकदा आंदोलने आमरण उपोषण व निवेदन दिले तरीही निर्णय घेतला नसल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी आश्वासन दिले दोन दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करून निर्णय घ्यायला लावू आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. असा विश्वास त्यांना दिला.
निवेदनात म्हटले आहे ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे. आर्थिक मागास घटकांतील तरुणांना व्यवसायिक मदतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी. प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह उभारावे. ब्राम्हण पुरोहितांना मासिक पाच हजार रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदीरात नियुक्ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदीरात नित्यपुजा लावली जावी. ब्राम्हण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 संवर्गात बदल करून त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातून मुक्त करण्यात यावे. परंपरागत राज्यातील मंदिरे ज्या त्या पूर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात यावे जेणेकरून मंदीराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थितीत अबाधित राहिल. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची, आयोगाची शासन स्तरावर नेमणूक करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या.
याप्रसंगी मुख्य समन्वयक दिपक गोपाळराव रणनवरे, जालना, धनंजय कुलकर्णी बीड, श्रीकांत जोशी अकोला, विजया अवस्थी, छ.संभाजीनगर(औरंगाबाद), विजया कुलकर्णी छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दिपाली देशपांडे पुणे, ईश्वर दिक्षित, बुलढाणा यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?