बेपत्ता मुलाची माहिती कळविण्याचे आवाहन...
बेपत्ता मुलाची माहिती कळविण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) – महानुभाव आश्रम, बीड बायपास सातारा परिसर येथील सागर चेतन कपाटे हा 12 वर्षे वयाचा मुलगा बेपत्ता झाला आहे असे सातारा पोलीस ठाणे यांनी कळविले आहे. नोंदविलेल्या तक्रारीनुसार, हा मुलगा दि.30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते अडीच वाजेच्या दरम्यान दुकानात जाऊन येतो असे सांगून गेला तो परत आलाच नाही. तो बेपत्ता झाला असे फिर्याद पोलीस ठाणे सातारा पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे. बेपत्ता बालकाचे वर्णनः- नाव- सागर चेतन कपाटे, वय 12 वर्षे, रंग – सावळा, उंची अंदाजे 4 फूट, बांधा – मध्यम, डोळे – काळे, चेहरा –गोल, केस – काळे, अंगात- लाल शर्ट व काळी पॅन्ट घातलेली वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्वरीत पोलीस ठाणे सातारा येथे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे संपर्क क्रमांक – 9702999090, तसेच पोलीस ठाणे सातारा संपर्क क्रमांक – 0240 – 2240565 येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?