भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने उद्या वक्फ विधेयकाच्या विरोधात देशव्यापी जेलभरो आंदोलन...!

 0
भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने उद्या वक्फ विधेयकाच्या विरोधात देशव्यापी जेलभरो आंदोलन...!

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने वक्फ विधेयकाच्या विरोधात देशव्यापी जेलभरो आंदोलन...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) वक्फ संशोधन बिल व विविध मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता देशव्यापी जेलभरो आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना इलियास फलाही, दिपक शिंदे, मुफ्ती नईम कास्मी, अलियारखान, संतोष साळवे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणा-या जेलभरो आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

वक्फ संशोधन विधेयक रद्द करावे. ओबीसी जाती आधारित जनजनना करावी. ईव्हिएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. गया येथील बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्त करावे, महापुरुषांचे अपमान करणारे वक्तव्य करणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी हे जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow