मनपा समोर उद्या एमआयएमचे धडक आंदोलन

मनपा समोर उद्या एमआयएमचे धडक आंदोलन
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज),
कृषी उत्पन्न बाजार समीती येथील गैरकारभार, अनधिकृत बांधकाम, अवैध प्लाॅट विक्री, नगर रचना विभागात रेखांकन मंजूर करण्याचा प्रयत्न, सर्वे नंबर दहा जाधववाडी मध्ये डिडिआर यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अवैध बांधकामावर नोटीस बजावली त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कार्यवाही केली नाही या विरोधात एमआयएम व व्यापारी अक्रामक झाले आहे. कृषी उच्चतम बाजार समितीच्या अवैध बांधकामावर कार्यवाही करावा. चुकीच्या रिवाईज रेखांकन मंजूर करु नये या मागणीसाठी उद्या दुपारी तीन वाजता धडक आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी व मोंढा व्यापारी असोशिएशनचे राकेश जैन यांनी दिला.
What's Your Reaction?






