महापालिका निवडणूक, प्रभाग 6 मधून मसरुर खान यांचा मतदार यादीवर आक्षेप...

 0
महापालिका निवडणूक, प्रभाग 6 मधून मसरुर खान यांचा मतदार यादीवर आक्षेप...

मतदार याद्यांतील चुका दुरुस्तीची काँग्रेसचे मसरुर सोहेल खान यांचा मागणी

आज एल एल एमचा पेपर असताना शेवटच्या दिवशी दाखल केला आक्षेप 

औरंगाबाद, दि.3(प्रतिनिधी )- महानगरपाकच्या प्रभाग क्र. 6 मधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. मसरूर सोहेल खान यांनी निवडणूक विभागाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करणारा आक्षेप आज शेवटच्या दिवशी दाखल केला आहे.

निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये प्रभाग क्र. 6 अंतर्गत अनेक वसाहती, कॉलनी आणि परिसरांतील मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे अर्जामध्ये नमूद केले आहे.

रोशनगेट, युनुस कॉलनी, मुजिब कॉलनी, करीम कॉलनी, शरिफ कॉलनी, किराडपूरा, आजम कॉलनी, बुकलगुडा, कैसर कॉलनी, रमनसपूरा, शताब्दीनगर, बाबर कॉलनी, तलावाडी, अरफात मशिद परिसर, कटकट गेट, जसवंतपुरा, हात्तेसिंगपूरा यांसारख्या वसाहतींतील नागरिकांची नावे संबंधित प्रभागाऐवजी इतर प्रभागांत नोंद झाल्याचे मसरुर सोहेल खान यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या चुकीच्या नोंदीमुळे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व संबंधित मतदारांची नावे योग्य प्रभागात तात्काळ दुरुस्त करून अंतिम मतदार यादीत बरोबर प्रतिबिंबित करावीत, अशी मागणी अॅड. मसरूर सोहेल खान यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow