वाहतूक पोलिस चुकीच्या पध्दतीने ई-चालान देत असल्याची तक्रार, शिस्तभंगाची कार्यवाई होणार...!

वाहतूक पोलिस चुकीच्या पध्दतीने ई-चालान देत असल्याची तक्रार, शिस्तभंगाची कार्यवाई होणार...!
मुंबई, दि.10(डि-24 न्यूज) वाहतूकीचे नियमन करण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलिस अधिकारी, अंमलदार हे त्यांचे खाजगी मोबाइलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढून ते सोयीनुसार ई चालान प्रणाली मध्ये अपलोड करुन चुकीचे चालान देतात याबाबतचा मुद्दा 2 जुलै रोजी परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संघटनांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे. या कार्यालयाकडून ई चालानची कार्यवाई करताना स्वतःचे खाजगी मोबाईल फोनचा वापर न करण्याचे आदेशित केले होते.
परंतु असे निदर्शनास आले आहे की अद्यापही काही पोलिस घटकातील अधिकारी, अंमलदार हे स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ(real time) सोडून ते सोयीनुसार ई चालान प्रणाली मध्ये त्यांचे मोबाईलमध्ये फोटोचा वापर करुन चुकीच्या पध्दतीने चलान जनरेट करतात. अशाप्रकारे खाजगी मोबाइलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चालान करताना अधिकारी, अंमलदार निदर्शनास आल्यास त्यांचे विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाई प्रस्तावित करावी असे आदेश राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षक यांना अपर पोलिस महासंचालक, वाहतूक प्रविण साळुंके यांनी काढले आहे.
What's Your Reaction?






