बाबा पेट्रोल पंप ते मोंढा नाका दरम्यान 229 बांधकामे निष्काशित

बाबा पेट्रोल पंप ते मोंढा नाका दरम्यान 229 बांधकामे निष्कासित
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण 229 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, दुकाने, शेड,कंपाऊंड, शेड, गॅरेज, कमान, जाहिरात फलक, इ. निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 350 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 250 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी 15 जेसीबी, 4 पोकलॅन, 15 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 5 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता (यांञिकी) अमोल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, अशोक गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहूल जाधव, नईम अन्सारी व इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सय्यद जमशेद, सय्यद मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे,
सुरज सवंडकर, राहूल मालखेडे, शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते.
उद्या मोंढा नाका ते एपीआय कॉर्नर पर्यन्त कारवाई...
उद्या दि ११ जुलै रोजी मोंढा नाका ते एपीआय कॉर्नर पर्यंत अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मार्गावर व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून आपली बाधित मालमत्ता काढून घ्यावे जेणेकरून त्यांचा नुकसान कमी होईल, असे आवाहन संतोष वाहूळे यांनी केले आहे.
बाबा पेट्रोल पंप मालक यांची अर्ज फेटाळली...
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेली मुख्य रस्त्यांवरचे अतिक्रमण काढण्याची मोहिमेची सुरुवात आज सकाळी बाबा पेट्रोल पासून झाली. यावेळी सदरील पेट्रोल पंप चे मालक रूमी बाबा प्रिंटर यांनी पेट्रोल पंप ची मार्किंग बाबत अतिक्रमण पथकाशी वाद घातला आणि उच्च न्यायालयात दाद मागायला गेले.
यावेळी माननीय उच्च न्यायालयाने त्यांची दाद फेटाळली आणि महापालिकेतर्फे सुरू असलेली मोहिमेचे कौतुक केले.
What's Your Reaction?






