शहरात अनधिकृत बॅनर लावल्याने इस्लाम पार्टीच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल...
अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी इस्लाम पार्टी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- शहरात इस्लाम पार्टीच्या वतीने ईद मुबारकचे बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बॅनर लावल्याने इस्लाम पार्टीचे नेते रफत यारखान व भाई इम्तियाज यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मिलकॉर्नर ते बारापुल्ला गेट दरम्यान सरकारी लाईट पोलवर परवानगीशिवाय शुभेच्छा फलक लावल्याप्रकरणी इस्लाम पार्टीच्या नेत्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार गस्तीदरम्यान ‘EID MUBARAK’चे अनधिकृत बॅनर लावल्याचे आढळून आले. भाई इम्तेयाज व रफतयार खान यांनी मनपाची परवानगी न घेता फलक लावून जाहिरात कराचे आर्थिक नुकसान व शहराचे विद्रूपीकरण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 244 व 245 अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
.
What's Your Reaction?