"हम दो हमारे 12" या हिंदी चित्रपटाला मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध, ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी
"हम दो हमारे 12" या हिंदी चित्रपटाला मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध, ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) सोशल मीडियावर सध्या "हम दो हमारे 12" या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर दाखवला जात आहे. या चित्रपटात इस्लाम धर्माची बदनामी केली आहे व मुस्लिम समाजात महीलेला सुखाची वस्तू म्हणून वापर केला जातो असे दाखवले गेले आहे. चित्रपटात महीलेची बदनामी केली आहे. हे खोटे आहे यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटावर व ट्रेलरवर बंदी घालावी. मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. असा इशारा विभागीय आयुक्तांद्वारे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज निवेदन शिष्टमंडळाने दिले आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमानी, शेख शफीक, मोहम्मद ताहेर, अश्रफ पठाण, मोहम्मद इस्माईल मेमन, मुन्नाभाई , फेरोज अली, अखिल अख्तर आदींचे निवेदनात सही आहे.
What's Your Reaction?