अंबादास दानवेंनी दिले अमित शहा यांना प्रत्यूत्तर, असली शिवसेना त्यांच्याकडे असताना अशी लाचारी कशासाठी

अंबादास दानवेंनी दिले अमित शहा यांना प्रत्यूत्तर, कोण असली कोण नकली जनतेला माहिती आहे...!
भाजपा म्हणते असली शिवसेना त्यांच्याकडे आहे मग लोकसभेच्या दहा जागा सुध्दा दिले नाही भाजपाला विचारुन तिकीट मिळत आहे मग हि लाचारी कशासाठी, दानवेंचा प्रश्न
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) कोणती शिवसेना असली आहे कोणती राष्ट्रवादी असली आहे जनतेला माहिती आहे. असली कोण नकली कोण, पक्ष फोडण्याचे काम कोणी केले, भाजपाचे नेते काही बोलत आहे. मोदी शाह घाबरलेले आहे म्हणून अशी वक्तव्ये ते करत आहे. भाजपाने जे वचन 2014 पासून दिले होते ते पूर्ण केले का हे बघावे. हर घर छत हर घर नल यांचे काय झाले, महागाई नियंत्रणात आली का, रोजगार मिळाले का, आयुष्यमान भारत आरोग्य कार्डावर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार योजनेचा रुग्णांना लाभ मिळत आहे का...? सोयगावच्या एका मुलीची उपचाराविना जळगावच्या रुग्णालयात मृत्यू झाला. आयुष्यमान कार्ड चालला नाही म्हणून जीव गेला. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे पती काय म्हणत आहे देश ऐकत आहे. असा घणाघात भाजपा वर करत गृहमंत्री अमित शहा यांना विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंनी प्रत्यूत्तर दिले आहे.
काल अमित शहा यांनी नांदेड येथे सभेत महाविकास आघाडी वर टिका केली. ते म्हणाले एक नकली शिवसेना, दुसरी राष्ट्रवादी व अर्धी काँग्रेस असे म्हटले त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनीही भाजपा वर टिका करने सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अमित शहा यांच्या असली नकलीवर प्रत्यूत्तर दिले आहे.
दानवेंनी पुढे बोलताना सांगितले ईडी, सिबिआयचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जात आहे म्हणून या सरकारी यंत्रणेच्या कार्यालयासमोर भाजपाच्या शाखेचे बोर्ड लावले पाहिजे असा गंभीर आरोप भाजपा वर केला. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






