अंबादास दानवे व विनोद पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ....!

 0
अंबादास दानवे व विनोद पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ....!

अंबादास दानवे व विनोद पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ....!

नाराज असलेले दानवे विनोद पाटील यांना पाठिंबा देतील का...? सर्वांच्या मनात प्रश्न

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) शिंदे गटाचे लोकसभा मतदारसंघातील दावेदार विनोद पाटील यांनी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भेट झाल्यावर काय चर्चा झाली हे विचारले असता विनोद पाटील यांनी सांगितले मला उमेदवारी मिळो अथवा न मिळो मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे. वरिष्ठ नेत्यांकडे मी उमेदवारी मागितली आहे मला ठाम विश्वास आहे मला उमेदवारी मिळेल. अंबादास दानवे हे जेष्ठ असल्याने मी भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद मागितला. त्यांना विधानपरिषद निवडणुकीत निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले होते आता माझी वेळ असल्याने मी त्यांना पाठिंबा मागितला. ते पाठिंबा देतील असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केल्याने अगोदरच शिवसेना उध्दव ठाकरे गटात दानवे नाराज असल्याने त्याचा फायदा निवडणुकीत विनोद पाटील यांना होईल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विनोद पाटील यांनी सांगितले की मतदार संघातील प्रश्न काय आहेत मला माहित आहे. विकासाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. जेष्ठ नागरिक, युवक व महीलांच्या समस्यांची जाण आहे म्हणून या निवडणुकीत विजयासाठी लढायचा प्रयत्न असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीचे जेष्ठ नेत्यांची साथ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अगोदरच शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व काँग्रेस यांची प्रचारात साथ मिळवण्याचे व अंबादास दानवे यांची नाराजी दुर करण्याचे मोठे आव्हान खैरे समोर उभे राहिले आहे. विनोद पाटील यांनीही निवडणुकीची पूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केल्याने महायुतीचा उमेदवार कोण हे जाहिर झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. वंचित व मनसेची भूमिका सुध्दा महत्वाची आहे. सर्वांचे लक्ष आता महायुतीचा उमेदवार कोण याकडे लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow