अखेर मनपाचा बुलडोझर रस्त्यावर, 144 अतिक्रमणे जमीनदोस्त, अमोल येडगे यांची पाहणी...

 0
अखेर मनपाचा बुलडोझर रस्त्यावर, 144 अतिक्रमणे जमीनदोस्त, अमोल येडगे यांची पाहणी...

महानगरपालिकेची अतिक्रमणविरोधी मोठी कारवाई; 144 अतिक्रमणे हटवली

या कारवाईनंतर चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यावर होणार असल्याची माहिती वाहुळे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना दिली.‌‌..‌

न्यायालयाचे आदेश असताना अतिक्रमण पाडल्याने वकीलांचा पथकावर संताप वादविवाद झाल्याची घटना घडली...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 29(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेतर्फे आज शहरातील सेवन हिल ते शाहनूर मिया दर्गा चौक या दरम्यान अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 144 अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. यामध्ये छोटे-मोठे अतिक्रमण, पत्र्याचे शेड तसेच पक्क्या बांधकामांचा समावेश होता.

ही कारवाई सलग नऊ तास चालली असून महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. तसेच मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी श्री. संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. कारवाईदरम्यान आयुक्त श्री. येडगे यांनी प्रत्यक्ष स्थळी सुमारे एक तास उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

कारवाईच्या वेळी सहा जेसीबी, सहा टिप्पर, एक अग्निशमन बंब आणि एक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. या मोहिमेत महानगरपालिकेचे सुमारे 100 कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तासाठी 50 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. याशिवाय माजी सैनिक, महानगरपालिकेचे सर्व इमारत निरीक्षक, सहाय्यक आयुक्त श्री. विलास भांगे, श्री. मोहम्मद समीउद्दीन आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला.

महानगरपालिकेतर्फे शहरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले

आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow