अखेर महाराष्ट्रात वक्फ बोर्डाची बुलडोझर कार्यवाही सुरु...भूमाफीयांचे धाबे दणाणले

 0
अखेर महाराष्ट्रात वक्फ बोर्डाची बुलडोझर कार्यवाही सुरु...भूमाफीयांचे धाबे दणाणले

अखेर वक्फचा "बुलडोझर" चालला....अन कब्रस्तानची जागा मोकळी.!

भूमाफीयांचे धाबे दणाणले...

मु.का.अ. ताशीलदार यांच्या पुढाकाराला यश..!

औरंगाबाद, दि.20 (डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वतीने राज्यातील विविध ठिकाणी भूमाफिया व अतिक्रमनधारकांवर आता "बुलडोझर कारवाई" सुरू करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे जमीनीवर अवैधरित्या कब्जा करणाऱ्यावर फौजदारीची धडक कारवाई ही सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद तालुक्यातील बनगाव येथील कब्रस्तानची तब्बल 7 एकर जागेवरील ताबा थेट बुलडोझर चालवून निष्काशित करण्यात आला आहे. अशी माहिती वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोईन ताशीलदार यांनी दिली. बनगाव, तालुका औरंगाबाद येथील गट नंबर 160 मधील तब्बल सात एकर जागेवर नाना अप्पागिरे, अझहर बंडू, युनूस बंडू, अय्युब बंडू, नासिर बंडू व महेमुद बंडू यांचे अतिक्रमण होते. या संदर्भात 2019 मध्ये वक्फ मंडळा मार्फत सदर ग्रामपंचायत मार्फत अतिक्रमण निष्काशित करण्याचे पत्र पाठविण्यात आले होते. तसेच भूमी अभिलेख विभाग व पोलीस अधिक्षकांनाही पत्रव्यवहार करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने गेली 4 वर्षे कारवाईस विलंब झाला. 2021 मध्ये या प्रकरणा बाबत जिल्ह्याचे खासदार व वक्फ मंडळाचे खासदार तथा वक्फ बोर्डाचे सदस्य इम्तियाज जलील यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिस शेख यांना कब्रस्तानची जागा त्वरित निष्कशित करण्या संदर्भात पत्र दिले होते. अनिस शेख गांनी परत पोलीस अधिक्षकांना पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यात बाबत पत्र पाठविले होते. वक्फ मंडळाकडून सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. पोलीस अधिक्षकांनी या बाबत दखल घेत पोलीस बंदोबस्त देण्यास संमती दर्शविली.

गेल्या दोन ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षकांनी यांनी बंदोबस्त बाबत वक्फ मंडळाला पत्र दिले. 17 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मोईन ताशीलदार यांच्या आदेशान्वये व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जूनेद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वक्फ अधिकारी असिफ मुतवल्ली त्यांचे सहकारी एहतशाम शेख, अनवरखान, भूमी अभिलेख अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत बुलडोझर चालवून तब्बल 7 एकर जागा मोकळी करण्यात आली. या बाबत ग्रामपंचायत बनगावचे सरपंच, सदस्य व इतर गावकऱ्यांनी ही कारवाईच्या वेळेस सहकार्य केले. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान असताना ही दफनभूमी साठी जागा अपुरी पडत होती. वक्फ मंडळाच्या या कारवाई मुळे गावातील मुस्लिम समाजाची मोठी अडचण दूर झाली आहे. या कारवाई नंतर गावकऱ्यांनी वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोईन ताशीलदार यांचे आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow