अजब गजब मागणी... महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका घेवू नका...!

 0
अजब गजब मागणी... महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका घेवू नका...!

अजब गजब मागणी... महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका घेवू नका...!

निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन सादर करुन केली मागणी...

औरंगाबाद,दि.13(डि-24 न्यूज) सध्याचे महाराष्ट्रातील राजकारणात आता लोकशाही उरलेली नाही म्हणून राज्यात विधानसभा निवडणुका घेवू नका अशी अजब गजब मागणी राज्यातील निवडणुक आयोगाला पत्र पाठवून करण्यात आली आहे. हि मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सफाई कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान भय्या पटेल यांनी केली आहे. अशी माहिती त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

त्यांनी पत्रात म्हटले आहे मागील साडेतीन वर्षात राज्यामध्ये परिस्थिती खराब झाली आहे. राज्यात दोन राष्ट्रीय पक्ष व तीन प्रादेशिक पक्ष आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्ष भाजपा व काँग्रेस आहे. प्रादेशिक पक्ष शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. मागील तीन वर्षात मनसे सोडून सगळ्या पक्षांनी सत्ता भोगली जनतेच्या मताशी यांना काही देणे घेणे नाही. केंद्रातील सरकारने इडी, सिडी, सिबिआय, पैशाचा वापर करून तीन वर्षानी पुन्हा सत्ता मिळवली. हिंदूत्वाच्या नावाखाली 50 खोके कार्यक्रम ओके करुन आर्धी शिवसेना फोडून आपल्या सत्तेची पोळी भाजली सत्ता बळकट करण्यासाठी आर्धी राष्ट्रवादी सोबत घेतली. जनतेने आपल्या नेत्याला निवडून दिले समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी पण आपलाच उमेदवार त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसतो जर सोबत जात नसेल तर त्याला जेलमध्ये टाकतात अशी परिस्थिती आहे. तिकडे जाणारे आमदार म्हणतात मी जनतेच्या विकासासाठी त्यांच्यासोबत जात आहे. पण जनतेचा काहीच विकास होत नाही. विकास होतो फक्त त्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा व जवळच्या कार्यकर्त्यांचा. राज्यात निवडणुका घ्यायचे असल्यास हजारो कोटी खर्च होतात हा खर्च निव्वळ वाया चाललेला आहे. याचा अभ्यास व्हायला हवा. निवडणूक नाही घेतली तर हे पैसे वाचतील त्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.  

मराठवाड्यात दुष्काळ जन्य परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. निवडणुकीच्या कामाला अधिका-यांना लावतात. भोंगे लावून नेते मतदारांना झोपू देत नाही. यामुळे आता महाराष्ट्र राज्यात निवडणुका घेवून काही फायदा नाही. कारण जनतेच्या मताला आता काही महत्त्व उरलेले नाही. हि मागणी माझी स्वतःची आहे. यामध्ये माझ्या पक्षाचा किंवा नेत्याचे घेणे देणे नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला मागणी करण्याचा अधिकार दिले आहेत. या मागणीचा योग्य विचार करत निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow