अनधिकृत बॅनर काढणे सफाई कामगाराच्या जीवावर बेतले, कुटुंबाचा घाटीत आक्रोश
अनधिकृत बॅनर काढणे सफाई कामगाराच्या जीवावर बेतले, कुटुंबाचा घाटीत आक्रोश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- शहरात अनधिकृत बॅनर काढण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. बॅनर्स काढण्याची कारवाई एका सफाई कामगाराच्या जीवावर बेतली. मुकुंदवाडी परिसरात हनुमान मंदिरावरील होर्डिंग्ज काढताना लोखंडी फ्रेम 33 केवी वीज तारेच्या संपर्कात आल्याने महापालिकेचे कर्मचारी अमोल दिनकर जाधव, वय 27, यांचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी घटनेमुळे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत रवी रनधिर रिडलाॅन, वय 38, गंभीर जखमी झाल्याने खाजगी सिग्मा हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजता मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरावर लावलेले अनाधिकृत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई महानगरपालिकेकडून सुरू होती. कर्मचारी लोखंडी फ्रेम असलेले होर्डिंग्ज खाली उतरवत होते. होर्डिंग्ज काढल्यानंतर त्याची लोखंडी फ्रेम जवळून जाणाऱ्या 33 kv वीज तारेच्या संपर्कात आली यामुळे अमोल जाधव यांना तीव्र विजेचा धक्का बसला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले डाॅक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी शव घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा कुटुंबाने आक्रोश करत या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
What's Your Reaction?