अफसरखान, अमीत भुईगळ, मेघानंद जाधव, झरीना जावेद कुरेशी यांचा मोठा विजय...

 0
अफसरखान, अमीत भुईगळ, मेघानंद जाधव, झरीना जावेद कुरेशी यांचा मोठा विजय...

अफसरखान, अमीत भुईगळ, मेघानंद जाधव, झरीना जावेद कुरेशी विजयी

आणखी एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून येण्याची परिस्थिती परंतु तेथे रिकाऊंटींगची मागणी झाल्याने सतीश गायकवाड व तीन सहकारी यांचा निकाल अजून लागलेला नाही...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 3 कडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रभागात चारही नगरसेवक वंचित बहुजन आघाडीने जिंकले आहे. अफसरखान, अमित भुईगळ, मेघानंद जाधव, झरीना जावेद कुरेशी हे विजयी झाले आहेत. सतीश गायकवाड यांच्या प्रभागातून चारही नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. तेथे विरोधी उमेदवारांनी रिकाऊंटींगची मागणी केली आहे. या निवडणुकीत वंचितचे एकूण आठ उमेदवार निवडून येतील अशी शक्यता आहे परंतु रिकाऊंटींगमुळे चार नगरसेवकांचे विजयाचे घोडे अडले आहे अशी माहिती राज्याचे प्रवक्ते तय्यब जफर यांनी दिली. वंचितच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow