अमित शहा यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस अक्रामक, शहरात काढला सन्मान मोर्चा
गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा ...
जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन सादर केले....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)
आज सकाळी औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकापासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ.कल्याण काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सन्मान मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांच्या बंदोबस्तात हा मोर्चा औरंगपुरा, गुलमंडी, रंगारगल्ली मार्गे सिटीचौक, शहागंज, चेलिपुरा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. सरकारच्या विरोधात यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. गळ्यात निळे व काँग्रेसचे रुमाल, हातात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा असे पोस्टर हातात घेऊन मोर्चा पुढे जात होता.
संविधानावरील गंभीर आणि महत्त्वपूर्ण चर्चा म्हणून जी सुरुवात झाली ती भाजपच्या राजकीय संधिसाधूपणाच्या लज्जास्पद प्रदर्शनात बदलली. प्रसंगी प्रतिष्ठा जपण्याऐवजी भाजपने विरोधी पक्षनेत्यांची बदनामी आणि अपमान करण्यासाठी व्यासपीठाचा गैरवापर केला. त्याहूनही वाईट म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यघटनेचे मूलतत्त्व आणि त्याचे प्रमुख शिल्पकार डाॅ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची अवहेलना केली.
गृहमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य-"आता ही एक फॅशन बनली आहे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर. 'इतक्या वेळी तुम्ही जर देवाचे नाव घेतले असते तर तुम्हाला पुढचे सात जन्म स्वर्गाची प्राप्ती झाली असती." (आंबेडकर वारंवार म्हणणे ही एक फॅशन बनली आहे. त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर त्यांना सात जन्मासाठी स्वर्ग मिळू शकला असता) - हा केवळ डॉ. आंबेडकरांचा अपमान नव्हता तर थेट भारताच्या आत्म्याचा अपमान होता.
हे भयंकर वर्तन असूनही भाजप आणि त्यांच्या नेतृत्वाने कोणताही पश्चाताप दाखवला नाही. त्याऐवजी, ते अशा विधानांचा बचाव करून कोट्यवधी भारतीयांना होणाऱ्या दुखापतींना आणखी वाढवत आहेत, त्यांच्या गंभीर घटनाविरोधी आणि दलितविरोधी मानसिकतेचा पर्दाफाश करत आहेत.
या घटनेच्या विरोधात गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा" सकाळी ठीक 11.30 वा. महात्मा ज्योतिबा फुले स्मारक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला व व शहागंज येथील महात्मा गांधी पुतळा मार्गे मोर्चा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष खा.डॉ. कल्याण काळे व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, डॉ.जफर खान, अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ. पवन डोंगरे, सय्यद अक्रम, शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिपाली मिसाळ, पश्चिम महिला ब्लॉक अध्यक्ष रुबीना सय्यद, शहरजिल्हा महासचिव निर्मला शिखरे,अनिता भंडारी, शिला मगरे, विद्या घोरपडे,एम.के. देशमुख, लहू शेवाळे, रविंद्र काळे, जगन्नाथ काळे, इंजि.विशाल बन्सवाल, राहुल सावंत, विश्वास औताडे,अशोक डोळस, संदीपराव बोरसे, संतोष शेजूळ, सचिन पवार, गजानन मते, प्रकाश सानप, विठ्ठल कोरडे, संदीपराव पवार, विश्वास औताडे, कृष्णा भंडारे, प्रशांत शिंदे, अविनाश भालेराव,आतिश पितळे, गौरव जैस्वाल भगवान मते, ,इक्बालसिंग गिल, अमजद पटेल, पुंडलिक जंगले, निमेश पटेल, बाबासाहेब मोकळे श्रीकृष्ण काकडे,कैसर बाबा, शेख फय्याजोद्दीन, मनोज शेजवळ, निमेश पटेल मोहन देशमुख, भास्कर घायवट, महेंद्र रमंडवाल, उमाकांत खोतकर, युनूस लिडर, संतोष भिंगारे, सुरेंद्र साळुंखे, सलीम इनामदार, अमजद खान ,अस्मत खान, रमाकांत गायकवाड, अलंकृत येवतेकर, शुभम साळवे, यावेळी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.
What's Your Reaction?