अयोध्येत हवे बुध्द विहार, लोकसभेत दोन जागेची आठवलेंची मागणी
अयोध्येत हवे बुध्द विहार रिपाइला लोकसभेच्या दोन जागा हव्यात- केंद्रीय मंत्री रामदास आठवले
राहुल गांधी यांची भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा...
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) अयोध्येत राम मंदिर बनत आहे दुसरीकडे मस्जिद बांधण्यासाठी पाच एकर जागा देऊन तेथे भव्य मस्जिद उभारली जात आहे. हि भुमी बुद्धांची आहे येथे भव्य बुध्द विहार बनवले पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकात परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले.
पुढे ते म्हणाले भाजपा व शिवसेनेला सत्तेत आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे. यामुळे आगामी होणा-या लोकसभेच्या निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्यात अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे. याबाबत काय निर्णय येतो त्यांनतरच आपली पुढील दिशा ठरवू. ते सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आठवले हे नामविस्तार दिनानिमित्त आयोजित सभेला मार्गदर्शन करण्यासाठी शहरात आले आहे. यावेळी त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलतांना ते म्हणाले, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात रिपाईला मंत्रीपद द्यावे अशी मागणी मी सातत्याने करत आलो आहे मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. आमच्या पक्षाला का डावलले जाते हे मात्र माहित नाही. राज्य मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या विस्तारात आमच्या पक्षाला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी होणा-या लोकसभेच्या निवडणूकीत कोल्हापूर आणि विदर्भातील एक असा दोन जागा मिळाव्यात अशी आशा ही त्यांनी व्यक्त करून मी पुन्हा शिर्डी मतदार संघातून नशीब आजमावाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्ष जोडणारा पक्ष...
भाजप राज्यातील छोटे पक्ष संपवत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर आठवले यांनी भाजपला पूर्ण बहुमत असतांनाही ते छोट्या - छोट्या पक्षांना सोबत घेऊन वाटचाल करीत आहे. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टीचा ही समावेश आहे. त्यामुळे छोटे पक्ष संपवणारा पक्ष म्हणून भाजपला नाव ठेवू नये असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. राहुल गांधी बाबत बोलतांना ते म्हणाले, राहुल गांधी भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा करीत आहे अशी उपमा त्यांनी दिली. पत्रकार परिषदेत पप्पू कागदे, बाबूराव कदम, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, दौलत खरात, दिपक निकाळजे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?