अल्पसंख्याक आयुक्तालय नावाला, मंजूर 36 पदे अद्यापपर्यंत भरली नाही...!

अल्पसंख्याक आयुक्तालय नावाला, मंजूर 36 पदे आतापर्यंत भरली नाही...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) शासनाने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापना करून एक वर्ष झाले परंतु आद्यापर्यंत उपायुक्त, सहाय्यक आयुक्त एकूण 36 जागा भरल्या नाहीत ह्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावे या मागणीसाठी अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.
शासनाने एक वर्ष उलटून गेल्यानंतरही अल्पसंख्याक आयुक्तालयाची घोषणा केली परंतु ही घोषणा फक्त कागदावरच करण्यात आली. प्रत्यक्षात त्याचे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शासनाने अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करुन एक वर्ष झाले परंतु आद्य पर्यंत या जागा भरलेल्या नाहीत यामध्ये एकूण 36 जागा रिक्त आहे. महाराष्ट्र मराठवाड्यातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहेत तात्काळ शासनाने या रिक्त जागा भरण्यात याव्या याबाबतचे निवेदन अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये मा मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून 100 दिवसाच्या आत प्रत्येक विभागाचे विकास आढावा बैठक घेण्यात येतात परंतु अल्पसंख्यांक विकास कामाची आद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली नाही. तात्काळ ही बैठकी घेण्यात यावी तसेच अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीची पद भरती करण्यात यावी,
रिक्त पदे लवकरात लवकर भरून योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी नसता अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाविरोधात संताप करून लोकशाही मार्गाने निर्देशने मोर्चे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सभापती ॲड एक्बालसिंग गिल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव आमेर अब्दुल सलीम, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रेखाताई राऊत, परिवहन विभागाचे अध्यक्ष असमत खान, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शोएब आब्दुल्ला, रंजनाताई हिरवाळे, रफीक खान, अझहर शेख, ऐतेशाम खान, अजमल कादरी, मुस्ताक शेख, अरसलान खान, संजय जाधव, मीनाज शब्बीर शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






