आईचे दूध पिले असेल तर भोंग्याला हात लावून दाखवा, एमआयएमचे नाव न घेता अबु आझमींची टिका
आईचे दूध पिले असेल तर भोंग्याला हात लावून दाखवा, एमआयएमचे नाव न घेता अबु आझमींची टिका
किराडपुरा येथील जाहीर सभेत हजारोंचा जनसमुदाय, डॉ.कादरींना विधानसभेत पाठवण्याचे अबु आझमींचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) सरकार आले तर 24 तासात मस्जिदचे भोंगे काढणार असे वक्तव्य करणाऱ्यांचा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु आसिम आझमी यांनी किराडपुरा येथील भरगच्च जाहीर सभेत समाचार घेतला. त्यांनी इशारा दिला धार्मिक तेढ निर्माण करणा-यांना या निवडणुकीत जनता घरी बसवणार आहे व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. एका विशिष्ट समाजाच्या विरोधात गरळ ओकणे, धमक्या देने आपल्या देशाच्या संस्कृतीला शोभा देत नाही. देशात हे 2014 नंतर द्वेषाचे राजकारण सुरू झाले. लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणा-यांना संविधानाची रक्षा करणारे व धर्मनिरपेक्ष लोकांनी 240 वर रोखले. आता या निवडणुकीत तीच वेळ आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादीचे उमेदवार डॉ.गफ्फार कादरी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा. सायकलवर बसुन आम्ही दोघे विधानसभेत जाणार आहे हे लक्षात ठेवा. एमआयएमचे नाव न घेता त्या पक्षाने डॉ.कादरींचा पत्ता कट केला. एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला समाजवादीने त्यांना सावरले आता तुमची जवाबदारी आहे त्यांना निवडून आणण्याची. नाव न घेता एमआयएम वोट कटवा पार्टी आहे. माझ्या व मुला विरोधात त्यांनी उमेदवार दिला तरी त्यांना यश मिळणार नाही. अगोदर पण दिले यावेळी सुध्दा त्यांचे उमेदवार उभे आहेत. डॉ.कादरी हे मत विभाजनासाठी मैदानात उतरलो नाही तर जिंकण्यासाठी रिंगणात उतरलो आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ.गफ्फार कादरी आपल्या भाषणात विरोधकांवर कडाडले.
यावेळी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मंचावर राज्य सचिव अब्दुल रऊफ, कलिम कुरैशी, हबीब कुरैशी, नासेर नाहदी चाऊस, मुसा चाऊस, अबुबकर अमोदी, आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष विजय खंडारे, मुस्तफा खान, जमील खान, अब्दुल रऊफ, सोहेल जलिल आदी उपस्थित होते
.
What's Your Reaction?