आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पडेगाव घनकचरा केंद्रावर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा

 0
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पडेगाव घनकचरा केंद्रावर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा

पडेगाव घनकचरा प्रक्रिया केंद्रावर आता कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा...

दहा हजार लिटर क्षमतेचे 3 टँकर मनपा सेवेत...

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज )महानगरपालिकेव्दारे चिकलठाणा, पडेगाव व हर्सल घनकचरा प्रक्रिया केंद्रांवर कायमस्वरुपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

 महानगरपालिके मार्फत चिकलठाणा, पडेगाव व हर्सूल येथे घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलेले असुन, सदरील केंद्रांवर शहरात दैनंदिन उत्पत्ती होणारा कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जाते.

घनकचरा प्रक्रिया केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत असल्याने, याठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात.

 अशावेळी अग्निशमन विभागाच्या फायर टेंडर्सव्दारे आग विझवण्यात येते. परंतु फायर टेंडर्स येवून आग विझवण्यासाठी बराच वेळ लागतो व तोपर्यंत आग पसरुन मोठी दुर्घटना होण्याची संभावना असते.

 त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सदरील तीनही घनकचरा प्रक्रिया केंद्रांवर कायमस्वरुपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यााठी जाहीर निविदा मागवून मे. तिरुपती, ईलेक्ट्रीकल्स सेल्स अँड सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्यात आली. (मधुकर मुसडे)

एजन्सीमार्फत प्रत्येक घनकचरा प्रक्रिया केंद्रावर 100 एच.पी. क्षमतेचा 1 मुख्य पंप, 15 एच.पी. क्षमतेचा 1 जॉकी पंप व 100 बी.एच.पी. क्षमतेचा 1 किर्लोस्कर डिजेल पंप तसेच 17 हायड्रंट व्हॉल्व व 14 वॉटर मॉनिटर अशी यंत्र सामुग्री बसविण्यात आली आहे.

चिकलठाणा, पडेगाव व हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्रांवर कायमस्वरुपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्यााठी एकुण रु. 1,67,84,273 खर्च झालेला आहे.

सद्यस्थितीत पडेगाव येथील काम पूर्ण झाले असुन, हर्सूल व चिकलठाणा येथील काम अगामी 20 दिवसांमध्ये पुर्ण होणार आहे.

आज पडेगाव घन कचरा प्रक्रिया केंद्रावर बसविण्यात आलेल्या कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचे व 3 नवीन टँकरचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर अभियंता ए.बी देशमुख,उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

दहा हजार लिटर क्षमतेचे 3 टँकर मनपा सेवेत

 महानगरपालिकेचे 10,000 लि क्षमतेचे 3 वॉटर टँकर्स 15 वर्षे जास्त वयोमानाचे असल्यामुळे शासनाच्या नियमा नुसार स्क्रैप करण्यात आले आहेत.

त्यानुषंगाने 10 हजार लि. क्षमतेच्या वॉटर टँकर्ससाठी जीईएम पोर्टलद्वारे निविदा मागवुन 16 टन जीव्हीडब्ल्यु क्षमतेच्या 3 चेसीस मे. अशोक ले लॅन्ड लि. यांचेकडुन खरेदी करण्यात आले आहेत.

 सदरील चेसीसवर जाहीर निविदा मागवुन मे. ॲक्टिव्ह मोटर्स यांचे कडुन 10 हजार लि. क्षमतेचे 3 टैंकर्स उभारणी करुन घेण्यात आले आहेत.

सदरील टँकर्स प्रति नग रु 30,28,290/- दराने एकुण रु 90,84,870/- रकमेत खरेदी करण्यात आले असुन, खरेदी करण्यात आलेल्या टँकर्सचा वापर शहरातील झाडांना पाणी देणे, डिवायडर धुणे, रस्ते धुणे, लिचेट वाहतुक करणे इत्यादी कामासाठी करण्यात येणार आहे.अशी माहिती 

कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) महानगरपालिका यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow