आमची लढत ही एमआयएम सोबत आहे खैरेंशी नाही - मंत्री अतुल सावे
 
                                आमची लढत ही एमआयएम सोबतच - मंत्री अतुल सावे
खैरे तीन नंबर वर जातील...
पत्रकार परिषदेत भाजपा नेत्यांनी दिली माहिती
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत आमची लढाई ही चंद्रकांत खैरे सोबत नसून एमआयएम सोबत असल्याचे राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
लोकसभेच्या अनुषंगाने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
देशात सद्या 18 व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे. या निवडणुकीचा पाचवा टप्पा घेण्यात येत आहे. अशात औरंगाबाद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संदीपान भूमरे यांना लोकसभेत मोठ्या संख्येने निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या पासून डोअर टू डोअर जाऊन प्रचार करण्यात येणार असून शहारातील तिन्ही मतदार संघात 150 पेक्षा अधिक कॉर्नर बैठका घेणार आहे.
राम मंदीराचे सेल्फी पाॅईंट लावण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला संबोधित करताना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, आम्ही प्रचाराची सुरुवात केली असून मागील दीड वर्षापासून जिल्ह्यातील जवळपास 1800 बूथ वर आमची यंत्रणा ही कामाला लागली आहे. शहर सोबतच ग्रामीण भागात देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही प्रचार करत आहोत. प्रचार काळात आम्ही विविध ठिकाणी बैठका घेणार असून तशी रचना आम्ही लावलेली आहे. शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील मतदार संघात आम्ही महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना निवडून आणण्यासाठी जोरात प्रचार करत आहोत. विरोधकांना मुद्दा मिळत नसल्याने ते नको त्या अफवा सद्या जिल्ह्यात पसरवत आहेत. त्याकडे जनतेने लक्ष देण्याची गरज नसून आम्ही महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप सोबतच इतर घटक पक्ष देखील कामाला लागले असून आम्हाला खात्री आहे की यावेळी नक्कीच महायुतीचा विजय होईल अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी यावेळी दिली.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, यावेळी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, या निवडणुकीत आमची लढाई ही महाविकास आघाडी सोबत नसून एमआयएम सोबत आहे. मागच्या निवडणुकीत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी ते तीन नंबर वर राहतील असा विश्वास आहे. त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील अनेक आमदार आहे. त्यामुळे आम्ही एमआयएम आणि उबाठाचे उमेदवार या दोघांना पराभवाची धूळ चारत या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार आहोत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत कुठल्याही प्रचाकरची चूक होवू नये यासाठी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने बैठक प्रचार, सभा, रैली यांचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच उद्या पासून आम्ही सर्व भाजप चे पदाधिकारी, कार्यकर्ते डोअर टू डोअर जाऊन प्रचार करणार आहोत. त्यासोबतच विविध आघाडीच्या बैठका देखील घेण्यात येणार आहे. अत्यंत सूक्ष्म पद्धतीने प्रचाराची रूपरेषा आखण्यात आली आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात 50 काॅर्नर मिटींग घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला यात विजय मिळेल अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला अनिल मकरिये, बापू घडामोडे, शिवाजी दांडगे, जालिंदर शेंडगे, कचरू घोडके, दीपक ढाकणे, लक्ष्मीकांत थेठे, हर्षवर्धन कराड यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            