आमदार विलास भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, आंदोलनाला दिला पाठींबा...

आमदार विलास भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, आंदोलनाला दिला पाठिंबा...
मुंबई, दि.31(डि-24 न्यूज) -
पैठणचे शिंदे सेनेचे आमदार विलास संदिपान भुमरे यांनी मुंबई आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मराठा संघर्षयोद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा समाज बांधवांच्या हितासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला.
आंदोलनातील मागण्यांना न्याय मिळावा यासाठी सकारात्मक पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले. तसेच आंदोलनकर्त्यांच्या भावना शासन दरबारी मांडणार असल्याचा विश्वास दिला.
What's Your Reaction?






