धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 8 (डि-24 न्यूज) – जिल्ह्यातील 65 वर्षावरील पात्र ॲटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी महाराष्ट्र शासनाने धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. पात्र चालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
ॲटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालक यांनी http://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी. परवानाधारक चालक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे परवानाधारकांकडे 5 वर्षे जुना परवाना असावा व त्यांच्याकडे ॲटोरिक्षा व मीटर टॅक्सी वगळता त्यांच्याकडे कोणतेही चारचाकी वान नसावे. असे पात्र परवानाधारक चालक आवयक कागदपत्रे स्कॅन करुन दिलेल्या संकेतस्थळावर दिलेले शुल्क जमा करुन पावती स्वत: कडे ठेवण्यात यावी.
परवानाधारक चालक यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO OFFICE) येथे संपर्क करु शकतात.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सर्व पात्र चालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?






