इब्राहीम पटेल यांच्या प्रचारार्थ रैलीत जनसैलाब, प्रभाग क्रमांक 12 चे वातावरण काँग्रेसमय...
इब्राहीम पटेल यांच्या रॅलीने प्रभाग क्रमांक 12 मध्ये वातावरण काँग्रेसमय...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - आजा सायंकाळी 5.30 वाजता महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रभाग क्रमांक 12 चे काँग्रेसचे उमेदवार इब्राहीम पटेल व पॅनलच्या तीन उमेदवारांच्या प्रचारार्थ आझाद चौक येथून अभूतपूर्व रॅली काढण्यात आली. याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत हि रॅली रोशनगेट, शरीफ काॅलनी, कटकट गेट येथे समारोप करण्यात आला. कार्यकर्त्यांनी हातात निवडणूक निशाणी पंजा, काँग्रेसचा तिरंगा घेऊन इब्राहीम पटेल यांच्यासाठी मते मागितली. जागोजागी त्यांचा नागरीकांनी सत्कार केला. याप्रसंगी काँग्रेस प्रभागाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे. 15 जानेवारीला पॅनलच्या चारही उमेदवारांना मतदान करुन भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन रॅलीत उपस्थित नेत्यांनी केले. रॅलीत मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिकांना उपस्थित नोंदवला.
प्रभागात बदल हवा तरच विकास होईल, इब्राहीम पटेल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काँग्रेसचा विजय असो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. इब्राहीम पटेल यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी जणू विजयाचा जल्लोष साजरा केला असा प्रतिसाद रॅलीला मिळाला. प्रभागातील मतदारांनी संकल्प केला की या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलला विजयी करायचे आहे. 16 जानेवारीला पुन्हा विजयाचा जल्लोष साजरा करायचा आहे असा आत्मविश्वास इब्राहीम पटेल यांच्या प्रतिक्रीयेवरुन दिसून आला.
याप्रसंगी रमजानी खान, जमील खान, सहिर खान, ताहेर पटेल, रफीक पटेल, शाकेर पटेल, सदफ पटेल, शेख नईम, शेख आसेफ, शेख आरेफ, श्रीराम इंगळे, अब्बु पटेल, सरनवाज अन्सारी, शफी मौलाना, फेरोज खान, फय्यू शेख, निसार पटेल, शौकत पटेल, खालिक देशमुख, शेख हुजुर, शेख अस्लम, बिस्मिल्ला खाँ, जाकेर पटेल व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?