इम्तियाज जलील - अफसरखान पुन्हा आमनेसामने, अफसरखान यांच्यासाठी वंचितने बदलला उमेदवार
 
                                इम्तियाज जलील - अफसरखान पुन्हा आमनेसामने, वंचितने दिली उमेदवारी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. आज मोठी बातमी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून आली आहे. लोकसभा निवडणूकीत एमआयएमचे इम्तियाज जलील व वंचितचे अफसरखान यांचा सामना बघितला होता आता पुन्हा तीच वेळ आली आहे. औरंगाबाद पूर्व मधून वंचित बहुजन आघाडीने विकास रावसाहेब दांडगे यांना उमेदवारी दिली होती ती बदलून आता अफसरखान यांना देण्यात आल्याने मोठी राजकीय खेळी करण्यात आली असल्याची चर्चा या मतदारसंघातून सुरू झाली आहे. आज उमेदवारांच्या यादीत अफसरखान यांचे नाव आल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. अफसरखान यांची या मतदारसंघात इंट्री झाल्याने विधानसभेच्या निवडणुकीत रंगत वाढणार अशी शक्यता आहे. या मतदारसंघातून मुस्लिम मतांचे विभाजन व्हावे व पुन्हा भाजपाचा उमेदवार निवडून यावा यासाठी हा खटाटोप सुरू आहे अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. गंगापूर मधूनही वंचितने उमेदवार बदलला आहे. मौलाना सय्यद गफूर यांच्या ऐवजी अनिल चंडालिया यांना उमेदवारी दिली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            