उद्याची सचखंड एक्स्प्रेस उशिरा धावणार, शेतकरी आंदोलनाचा परिणाम
 
                                उद्याची सचखंड उशिरा धावणार , सहा दिवस मार्गात तात्पूर्ता बदल...
शेतकरी आंदोलनाचा फटका...
नांदेड,दि.6(डि-24 न्यूज )
उद्याची सचखंड उशिरा सुटेल, तर सहा दिवस सचखंड एक्सप्रेस च्या मार्गात तात्पुरता बदल
उत्तर रेल्वे मधील सुरू असलेल्या किसान आंदोलन मूळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे, तो पुढील प्रमाणे --
01. दिनांक 07 मे, 2024 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हुजूर साहिब नांदेड –अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिची नियमित वेळ सकाळी 09.30 वाजता सुटण्या ऐवजी दुपारी 15.00 वाजता सुटेल आहे.
काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे, त्या पुढील प्रमाणे –
मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या:
अनू क्र. गाडी क्रमांक दिनांक बदललेला मार्ग
1 12715
नांदेड-अमृतसर 04, 05, 06, 07, 08 आणि 09 मे 2024 जाखल, धुरी, लुधियाना
2 12716
अमृतसर - नांदेड 05, 06, 07, 08, 09 आणि 10 मे, 2024 लुधियाना, धुरी, जाखल
3 12751
नांदेड-जम्मू तावी 10 मे, 2024 जाखल, धुरी, लुधियाना
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            