उद्या मुस्लिम समाजाचे लाक्षणिक उपोषण, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

उद्या मुस्लिम समाजाचे लाक्षणिक उपोषण, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने अन्य समाजाच्या तुलनेत अल्पसंख्याक तरुणांच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक समानता आणण्यासाठी मौलाना आझाद संशोधन एण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा या प्रमुख मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन मार्टी कृती समितीचे अध्यक्ष अॅड अजहर पठाण यांनी केले आहे.
What's Your Reaction?






