उद्या शिवसेनेच्या वतीने श्रीराम रक्षा घंटानाद...!

 0
उद्या शिवसेनेच्या वतीने श्रीराम रक्षा घंटानाद...!

अयोध्या श्रीराम मंदिर देणगीतील अपहराविरोधात रविवारी ‘श्रीराम रक्षा घंटानाद...

छत्रपती संभाजीनगर, दि.4(डि-24 न्यूज)- अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगीत झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यव्यापी ‘श्रीराम रक्षा घंटानाद’ आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे रविवार 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी घंटानाद व महाआरती करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

या घंटानाद सोहळ्यात हिंदू बांधव, रामभक्त तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सहसंपर्कप्रमुख अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, विजयराव साळवे, जिल्हा संघटक डॉ. सुनील शिंदे, डॉ. शोएब हाश्मी, किसान सेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, उपजिल्हाप्रमुख बबन जाधव, अविनाश पाटील, अंकुश सुंब, संजय पिंपळे, अरविंद धिवर, जगन्नाथ पवार, विठ्ठल बदर, भाऊ सांगळे, विठ्ठल बदर, संतोष जेजुरकर, राजू इंगळे, लक्ष्मीनारायण बाखरिया, संतोष खेंडके, किशोर कच्छवाह, तालुकाप्रमुख मनाजी पाटील मिसाळ, संजय मोटे, सुभाष कानडे, राजू वरकड, विष्णू जाधव, मनोज पेरे, आनंद भालेकर, शंकर ठोंबरे, दिनेश मुथा, सोमीनाथ करपे, रघुनाथ घडमोडे,दिलीप मचे, तालुका संघटक मनोज गायके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, गोपाल कुलकर्णी, अण्णासाहेब शिदे, गणेश अधाने, रघुनाथ चव्हाण, मनपा गटनेते गणेश लोखंडे,महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सुनीता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, राखी परदेशी, नंदाबाई ठोंबरे, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, सुनंदा खरात, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, स्वाती माने, रुपाली मोहिते, मंगला कापरे, मीनाक्षी कळात्रे, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, विभागीय सचिव धर्मराज दानवे, जिल्हायुवाधिकारी विठ्ठल डमाळे, हनुमान शिंदे, उमेश मोकासे, शुभम पिवळ, युवतीसेना सहसचिव सानिका देवराज, कोमल पांढरे, दीपाली पाटील बोरसे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow