शहराच्या पाण्याची दाहकता छायाचित्रांच्या माध्यमातून रेखाटली...
 
                                शहराच्या पाण्याची दुर्दैशा शिवसेनेच्या छायाचित्र प्रदर्शनातून अधोरेखित...
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची छायाचित्र प्रदर्शनाला भेट...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.13(डि-24 न्यूज) : शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 13 मे रोजी शहरातील क्रांती चौक येथील झाशीची राणी उद्यानासमोर छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. या छायाचित्र प्रदर्शनातून शहराच्या पाण्याची गंभीर दुर्दशा अधोरेखित करण्यात आली. शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.
शहरात निर्माण झालेल्या पाण्याच्या वास्तविक स्थितीची दाहकता या छायाचित्रातून दाखविण्यात आली होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांना पाण्यामुळे होत असलेल्या त्रासाचा परिणाम अधोरेखित करून रात्री अपरात्री महिलांना जागरण करून पाणी भरावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची स्थिती दाखविण्यात आली होती.
शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. एकूण 55 छायाचित्रे या प्रदर्शनात भरविण्यात आली होती. शाळकरी मुले धोकादायक पद्धतीने कशाप्रकारे पाणी भरतात याची माहिती देणारे छायाचित्र या प्रदर्शनाचे वैशिष्ट होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            