उद्या सकल हिंदू जनजागरण मोर्चात बाबा रामगिरी, धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करु नये, पोलिस आयुक्तांना निवेदन
उद्या सकल जनजागरण मोर्चात बाबा रामगिरी, मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे पोलिस आयुक्तांना निवेदन... दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करु नये अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) उद्या सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात बाबा रामगिरी महाराज संबोधित करणार आहे. त्यांच्यावर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात 68 गुन्हे दाखल आहेत. याची पोलिस प्रशासनाला माहिती आहे. या मोर्चाचे आयोजक आहे राजेंद्र जंजाळ यांच्यावर हिंसा भडकावण्याचे बरेच प्रकरत आहे ज्याचा तपशील आपल्या कार्यालयात उपलब्ध आहे.
मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या वतीने बाबा रामगिरी महाराज यांच्या विरोधात 31 दिवस साखळी धरणे आंदोलन केले होते निवडणुका असल्याने निर्णय घेण्यासाठी सरकार नसल्याने लोकशाही मार्गाने केलेले आंदोलन स्थगित केले होते. अशा परिस्थितीत बाबा रामगिरी व राजेंद्र जंजाळ व सकल हिंदू जनजागरण समितीद्वारे कुठल्याही प्रकारचे भडकावू भाषण अथवा वक्तव्य करुन समाजात द्वेष पसरवून हिंसक घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी व उपाययोजना करावी.
प्रेषित मोहम्मद पैगंबर(स. अ. व. स.) व पवित्र ग्रंथ कुरान विषयी कसलीही व कुठलीही टिप्पणी अपशब्दाचा वापर सकल हिंदू जनजागरण समितीतर्फे होणार नाही याची दखल घेणे आवश्यक आहे. न्याय व शांतता प्रत्येक नागरिकांची गरज आहे. न्याय सुव्यवस्था व शांतता कायम राखणे शासन व पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे काही अनुचित हिंसक घटना घडली तर याची जवाबदारी महाराष्ट्र शासन, स्थानिक पातळीवर प्रशासन व पोलिस प्रशासनावर राहिल. कृपया याची सर्व संबंधितांनी गांभिर्यपूर्वक नोंद घेणे काळाची गरज आहे. या मागणीचे निवेदन मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या वतीने पोलिस आयुक्तांना दिले आहे. या निवेदनाची एक प्रत त्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिली आहे. निवेदनावर मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी, महासचिव मेराज सिद्दीकी, मुनतजीबोद्दीन शेख, मोईद हशर, कामरान अली खान यांची सही आहे.
What's Your Reaction?