जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत सोमवारी...

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत सोमवारी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1061 मधील तरतूदीनूसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रिांयासाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रिांयासाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. सोडत पद्धतीने कार्यवाही करण्याकरीता जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यक्रम सोमवार दि.13 ऑक्टोंबर वेळ दु.12 वा. स्थळ-जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर.
जिल्ह्यातील 9 पंचायत समिती कार्यक्रम वार सोमवार दि.13 ऑक्टोंबर, वेळ दु.12 वा.
स्थळः-पंचायत समिती फुलंब्री- तहसिल कार्यालाय फुलंब्री सभागृह ता. फुलंब्री,
पंचायत समिती खुलताबाद, सभागृह पंचायत समिती ता. खुलताबाद,
पंचायत समिती, गंगापूर तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय भवन ता. गंगापूर,
पंचायत समिती वैजापूर, विनायकराव पाटील सभागृह पंचायत समिती ता. वैजापूर,
पंचायत समिती पैठण, सभागृह पंचायत समिती ता.पैठण,
पंचायत समिती, कन्नड, तहसिलदार कार्यालय, बैठक हॉल ता. कन्नड,
पंचायत समिती, छत्रपती संभाजीनगर, मौलाना अबुल कलाम आझाद, संशोधन केंद्र सभागृह एन -12, हडको, ता. छत्रपती संभाजीनगर,
पंचायत समिती सिल्लोड, पंचायत समिती कार्यालय सिल्लोड, ता.सिल्लोड,
पंचायत समिती सोयगाव बचत भवन सभागृह पंचायत समिती ता. सोयगाव
या बैठकीस सर्व राष्ट्रीय व मान्याताप्राप्त राजकीय पक्षाचे पदधिकारी तथा जिल्हा परिषद पदधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
What's Your Reaction?






