उद्या सकाळी हर्सुलमध्ये धडकणार बुलडोझर...

उद्या हर्सूलमध्ये धडकणार बुलडोझर...
नागरीकांनी सहकार्य करावे पोलिस आयुक्त प्रविण पवार यांचे आवाहन...
हर्सूल टी पॉइंटपासून कारवाईला होणार सुरूवात - संतोष वाहुळे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5 (डि-24 न्यूज) - नारेगाव येथील कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा मोर्चा हर्सूल येथे सकाळी कारवाई करण्यात येणार आहे. उद्या सकाळी दहा वाजेच्या दरम्यान हर्सूल टी पॉइंटपासून कारवाईला सुरूवात होणार असून मनपा हद्दीतील समृद्धी लॉन्सपर्यंत ही कारवाई करण्यात येणार आहे., असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी मंगळवारी नारेगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हर्सूलमध्ये महापालिकेच्या वतीने अनाऊन्समेंट करून अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही मालमत्ताधारकांनी मार्कींग नंतर बांधकाम काढण्यास स्वतःहुन सुरु केले. त्यानंतर 13 जुलै रोजी हर्सूलमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेतली होती. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात ही बैठक झाली होती. त्यावेळी नागरिकांनी शहराच्या विकासाला विरोध नसून, महापालिकेने जागेचा रोख स्वरुपात मोबदला द्यावा, अशी मागणी केली. तर जागा संपादित करू, त्यावेळी मोबदला देवू, मनपाची परवानगी न घेता, केलेले अनधिकृत बांधकाम आम्ही पाडू, असे आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर अनेक अतिक्रमणधारकांनी आपली बांधकामे काढून घेण्यास सुरुवात केली होती. यानंतरही हर्सूलमध्ये नागरिक व स्थानिक नेत्यांच्या बैठकांचे सत्र गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. आजही तेथे स्थानिक नागरीकांनी पत्रकार परिषदेत उद्या होणा-या कारवाईला विरोध केला आहे. मनपा आयुक्तांनी अगोदर मालमत्ता धारकांशी चर्चा करावी त्यानंतरच कारवाईला सुरुवात करीवी अशी मागणी आहे. तसेच या रस्त्यावर असलेली धार्मिकस्थळे, कब्रस्तान, महापुरुषांची पुतळे काढून घेण्याबाबतही महापालिकेने नोटिसा दिलेल्या आहेत. तर धार्मिकस्थळांबाबत काही नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करत, कारवाईला जाहीरपणे विरोध केलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हर्सूलमध्ये कारवाई आणि मनपा प्रशासनाविरोधात वातावरण चांगलेच तापलेले आहे.
अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी
अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई करताना, आम्ही नागरिकांशी चर्चा करूनच पुढील कारवाई करत आहोत. आतापर्यंत सर्वच ठिकाणी नागरिकांकडून सहकार्य मिळाले आहे. शांततेतच सर्व ठिकाणी कारवाई पूर्ण झालेली आहे. उद्याही हर्सूलमध्ये आम्ही हात जोडून नागरिकांना विनंती करूनच कारवाई करणार. त्यांनी मान्य केले तर ठिक, नाहीतर पोलीस प्रशासन कारवाई करेल. हर्सूल येथील नागरिकांसोबत अगोदर बैठका झालेल्या आहेत. उद्या कारवाई तर करणारच, असा निर्धार व्यक्त करताना, हर्सूल येथील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही अतिक्रमण विभागप्रमुख वाहुळे यांनी केले.
हर्सुलच्या नागरीकांचा उद्या होणा-या कारवाईला विरोध...
उद्या सकाळी मनपा प्रशासनाच्या वतीने फौजफाट्यासह बुलडोझर अतिक्रमण काढण्यासाठी येणार आहे. उद्या होणा-या कार्यवाईला येथील नागरीकांनी विरोध केला आहे. अगोदर मनपा आयुक्तांनी येथील बाधित होणा-या मालमत्ता धारकांशी चर्चा करावी. कायद्यानुसार भुसंपादन प्रक्रीया करावी. कोणाची किती मालमत्ता जाणार त्या जागेचा पंचनामा करुन नोटीस द्यावी. अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने शंभर फुट रस्ता रुंदीकरणासाठी भुसंपादन करुन मालमत्ता ताब्यात घेतली परंतु आयुक्त आणखी शंभर फुट रस्ता रुंदीकरणासाठी मनमानी करत आहे. न्यायालयानेही हेच सांगितले कायदेशिर प्रक्रीया करुन रस्ता रुंदीकरण करावी. आमचा विकासाला विरोध नाही रोख रकम अगोदर द्या, आम्हाला टिडीआर नको अशी मागणी त्यांनी केली. मंदीर ट्रस्टने मागणी केली अगोदर जागा द्या नाही तर मंदीराला हात लावू देणार नाही. दोन मस्जिद, एक कब्रस्तान व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कमेटीनेही मागणी केली अगोदर आयुक्तांनी मोबदला किंवा जागा देण्याविषयी चर्चा करावी त्यानंतरच कार्यवाई सुरु करावी अशी मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
What's Your Reaction?






