उध्दव ठाकरे उद्या मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर...
मराठवाड्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज): मराठवाड्यात अतिवृष्टीने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानीसह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असल्याने शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी येणार आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार असल्याचे शिवसेना विभागीय नेते अंबादास दानवे यांनी कळविले आहे.
सकाळी 11.30 वाजता लातूर जिल्ह्यातील काडगाव येथे, दुपारी 12.30 वाजता धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकुर येथे, दुपारी 1.30 वाजता धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे दुपारी 3.30 वाजता बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे, दुपारी 4.30 वाजता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळ तर सायंकाळी 5.30 वाजता संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहे.
What's Your Reaction?






