उपजिल्हाधिका-यांचे निवडणूक प्रशिक्षण, 102 जणांचा सहभाग
 
                                उपजिल्हाधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण; 102 जणांचा सहभाग
औरंगाबाद ,दि.15(डि-24 न्यूज)- आगामी कालावधीत संभाव्य निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज विभागातील जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात उपजिल्हाधिकारी दर्जाचे 102 अधिकारी सहभागी झाले होते.
आज सकाळी जिल्हा नियोजन सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाच्या सुरुवातीला उद्घाटन सत्रात अपर जिल्हाधिकरी डॉ. अरविंद लोखंडे, उपायुक्त जगदीश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात नामनिर्देशन दाखल करणे ते संपूर्ण निवडणूक व अनुषंगिक सर्व प्रक्रियांबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कर्तव्य, जबाबदाऱ्यांबाबत माहिती देण्यात आली. अद्ययावत सुधारणा, तांत्रिक बदलाचे तपशिल, माध्यमांशी निगडीत बाबी, मतदार जनजागृती उपक्रम इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            