18 डिसेंबरला मार्टीची घोषणा होणार...?- मंत्री अब्दुल सत्तार

 0
18 डिसेंबरला मार्टीची घोषणा होणार...?- मंत्री अब्दुल सत्तार

18 डिसेंबरला मार्टीची घोषणा होणार...? - मंत्री अब्दुल सत्तार 

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) येणाऱ्या 18 डिसेंम्बर अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मुस्लिम समाजातील तरुणाच्या सर्वगिण विकाससाठी मार्टी स्वायत्त संस्था स्थापना करावी अड. अझर पठाण अध्यक्ष, मार्टि कृती समिती महाराष्ट्र राज्य गेल्या 3 वर्षांपासून मार्टी स्वायत्त संस्था स्थापनेची मागणी विविध आंदोलन, लक्षवेधी, निवेदन देऊन पत्र सादर करून पत्रकार परिषद करून महाराष्टातून होत आहे.

 मागील व सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा विधानपरिषद मधील आमदार तसेच विरोधी पक्षनेते यांनी अल्पसंख्यांक तरुणाच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासाच्या कार्यक्रमा मध्ये समानता आण्यासाठी मार्टी म्हणजे मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इंस्टीट्यूट ची आवश्यकता दाखवून मागणी केलीली आहे. 

सरकारची मार्टि स्थापना बाबत भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक दीनानिमित भाषणा दवारे मार्टि स्थापनेची घोषणा करू शकता अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी विधान परिषेद लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

 महाराष्ट्र शासनाद्वारे बार्टी, सारथी, महाज्योती, टार्ती, अमृत अशा विविध समाजातील तरुणाच्या सर्वांगिण विकाससाठी चालविणायत येणा-या, योजना व कार्यक्रम रबिण्यात येत आहे

 शासकीय UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये सहभाग वाढविण्यास उतेजन देणे.

 MPSC (State Services) स्पर्धा परीक्षा तयारीसाठी प्रशिक्षण देणे.

 महाराष्ट्र न्यायिक सेवा दिवाणी न्यायधीश कानिष्ठ स्तर व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग CJJD /JMFC) स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण देणे.

 अधिछात्रवृती योजना PHD MPHIL 200 अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी संख्या निश्चित करणे.

 Institiute of banking personnel selection IBPS PO IBPS Clerk स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणे.

 पोलिस भरती/अर्धसैनिक बल, आमफोर्स, पॅरामिल्ट्री कोर्स प्रशिक्षण योजनेचे स्वरूप निवासी करावे. तसेच त्या मध्ये मराठी भाषे बाबत प्रशिक्षण देने. 

 MS-CET, NEET,JEE मेडिकल इत्यादि सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, निशुल्क प्रशिक्षण देणे.

 इयत्ता 10 वी मध्ये 90% जास्त गुण मिळालेल्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी विशेष अनुदान योजना राबविणे. पुरस्काराची रकम रु 200 000/-

 परदेशी भाषा अभ्यासक्रम शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ति योजनामहराष्ट्रातील universities/ institutions मान्यता प्राप्त अनुदानित संस्था ,महविद्यालयातिल परदेशी भाषा(जर्मन,जपानी,स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन, पोर्तुगीज, व इतर भाषा इंग्रजी वगळून) पदवी/पदवीउत्तर पदवी शिक्षण घेणा-या विद्यार्थीसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ति योजना लाभ देणे

 परदेशी शिष्यवृती योजना राबविणे क्यूएस वर्ल्ड रॅन्कींगमधील दोनशेच्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी 50 पात्र विद्यार्थ्यांना परदेशातील शिष्यवृत्ती योजना राबविणे.

 कौशल्य विकास उपक्रम राबविणे तर्फे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना केंद्रावर एकूण 68 अभ्यासक्रम उपलब्ध करून , प्रशिक्षण कार्यक्रम निवासी आणि अनिवासी पद्धतीने राबविणे.

 केंद्र शासनाच्या NMMS शिष्यवृती गुणवत यादीत असलेल्या मात्र शिष्यवृती न मिळालेल्या 9 वीतील विद्यार्थ्यंना 12 वी पर्यन्त दरवर्षी 12,000 रु शिष्यवृती देणे.

 18 ते 50 वयोगटातील पात्रातधारक शेतकरी युवक यूवतींना राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) नि शुल्क प्रशिक्षण देणे.

 शेतकरी क्षमता बांधणी प्रकरचे प्रशिक्षण 10 कार्यक्रम राबविणे

 इंडो जर्मन टूल रूम IGTR कोर्सचे 18 ते 35 वयोगटातील युवक व युवतींना निशुल्क प्रशिक्षण देणे.

 स्वाधार /स्व्यमं /निर्वाह भत्ता योजना राबिवेने, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करणे विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुला-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करणे.

 योजना जनसामान्य पर्यंत पोहोचविण्याकरिता त्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्याकरिता समतादूत, तारादूत प्रकलप राबविणे.

त्याच धर्तीवर अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मौलाना आजाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (marti)मार्टि या नावाने महाराष्ट्र शासनाची स्वाययत संस्था येणाऱ्या अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर 2023 रोजी सरकारने घोषणा करून सदरहू दिवस अशाप्रकारे साजरा करावा ही विनंती मार्टि कृती समितीचे अध्यक्ष अँड अझर पठाण व कृती समिति सदस्य गण यांनी केली आहे सदर विषयी अधिवेशनात एल इ क्यु लक्षवेधी चर्चा करणे संदर्भात समितीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता, विधानसभा विधानपरिषदचे अधिकांश आमदार यांनी लेखी निवेदन अगोदरच दिले आहे व या विषयावर विधानसभा व विधानपरिषद मध्ये लक्षवेधी सूचना ही झाली व सुरू आहे. आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मार्टीची घोषणेची प्रतिक्षा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow