उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डाॅ.गफार कादरींचा जाहिर प्रवेश...

 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डाॅ.गफार कादरींचा जाहिर प्रवेश...

डाॅ.गफार कादरींचा राष्ट्रवादीत प्रवेश, अतिक्रमण व पाणी प्रश्नावर बोलने पवारांनी टाळले...!

बॅ.असदोद्दीन ओवेसी व इम्तियाज जलिल यांच्यावर डाॅ.कादरींचा हल्लाबोल...डाॅ.कादरींची घर वापसी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज डाॅ.गफार कादरी व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणात डाॅ.कादरी यांनी शहरातील पाणी प्रश्न लवकर सोडवावा व मनपा आयुक्त जी.श्रीकांत हे मनमानी पध्दतीने अतिक्रमण हटावो मोहिम मालमत्ताधारकांना नोटीस न देता मालमत्ता पाडल्या. यामध्ये अनेक लोक बेघर झाले. अशी तक्रार केली परंतु अजितदादा यांनी आपल्या भाषणात यावर बोलने टाळले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आठ वर्षांनंतर होणार आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे म्हणून राज्यात पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सदस्य नोंदणी जोमाने करुन निवडणुकीच्या तयारीला लागा. आपला पक्ष फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. सर्व जाती समुहांना सोबत घेवून राज्याचा विकास करायचा आहे. अल्पसंख्यांक समाजाचा सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्टीची स्थापना केली लवकरच निधीची तरतूद करुन अंमलबजावणी करण्यात येईल. मेरीटचे विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जावे यासाठी शिष्यवृत्ती देण्याची तरतूद केली आहे यामध्ये पुढील काळात वाढ केली जाईल. अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. अल्पसंख्यांकासाठी आणखी काही योजना आणण्यासाठी विचार विनिमय नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. वक्फची मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी अधिक सक्षम कायदा बनवावा लागेल असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. अल्पसंख्यांक समाजाने सोबत येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

डाॅ.गफार कादरी यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. माझे एज्युकेशन कॅम्पस हि पवारांनी केलेल्या सहकार्यामुळे उभे राहिले. दिवंगत वसंतदादा चव्हान यांनी पवारांची भेट घडवून आणली व विविध कोर्स या कॅम्पसमध्ये उभे राहुन हजारो विद्यार्थी येथे घडत आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅ.असदोद्दीन ओवेसी व माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर कादरींनी टिका केली. ते म्हणाले अजित पवार यांच्यावर वक्फ संशोधन कायदा संसदेत आला त्यावेळी टिका केली परंतु ओवेसी व जलिल यांना वक्फ बद्दल बोलण्याचा अधिकार नाही. या दोन्ही नेत्यांकडे वक्फची किती मालमत्ता आहे हे अगोदर बघावे. वक्फ मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या विरोधात इम्तियाज जलिल यांनी आंदोलन केले त्यानंतर सेटलमेंट करुन गप्प बसले. आपले पाच हजार स्केअर फुटवर कार्यालय थाटले. मोजकेच भाडे ते वक्फ बोर्डाला भरतात अशी जहरी टिका त्यांनी केली. अल्पसंख्यांक समाज आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत येईल. आपण या समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करत असल्याने हा समाज आपल्यावर खुश आहे अशी ग्वाही कादरींनी दिली.

याप्रसंगी शेकडो विविध पक्षातील माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी पक्षात प्रवेश केला.

व्यासपीठावर आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख, कैलास पाटील, सुनील मगरे, एड दत्ता भांगे, अब्दुल कय्यूम, मधुकर राजे अर्दड आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow