लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता अफसरखान महापालिकेच्या मैदानात...

 0
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता अफसरखान महापालिकेच्या मैदानात...

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर अफसरखान उतरणार महापालिकेच्या मैदानात...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे मैदान गाजवल्यानंतर आता माजी नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अफसरखान महापालिकेच्या मैदानात उतरणार आहे. काल त्यांनी बेगमपुरा येथे आपला वाढदिवस आपल्या चाहत्यांसोबत धुमधडाक्यात साजरा केला. त्यांनी अगोदर आपल्या मुलाला महापालिकेच्या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला होता परंतु वाढदिवसाच्या कार्यक्रमात अफसरखान हा चेहरा जनतेमध्ये लोकप्रिय असल्याने आग्रहाखातर प्रभाग क्रमांक 3 मधून हि निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी मागिल 20 ते 25 वर्षांपासून महापालिकेत नगरसेवक व विरोधीपक्षनेते व वार्ड सभापती म्हणून काम केले. एमआयएमचे ते कट्टर राजकीय विरोधक आहेत. इम्तियाज जलिल यांच्या व अन्य उमेदवार विरोधात दोनदा त्यांनी निवडणूक लढली. आता ते पुन्हा प्रभाग 3 मधून एमआयएम व अन्य पक्षांसमोर आव्हान उभे करणार आहे असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. वंचितचे सर्वेसर्वा एड बाळासाहेब आंबेडकर यांचे ते सध्या अधिक विश्वासू असल्याने त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow