उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी... पिठलं भाकरीचा घेतला अस्वाद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद
जालना, दि. 9 (डि-24 न्यूज) – राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाला भेट दिली.
जालना जिल्ह्यातील भिलपुरी येथील शेतकरी अंबादास तांगडे यांच्या घरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबासोबत पारंपरिक पिठलं-भाकरीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. शेतकरी कुटुंबाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंदही साजरा केला.
राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत असताना त्यांच्याप्रती आपुलकी व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार हिकमत उढाण, आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?